E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
मित्र बनले शत्रू (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
टेस्ला ही एकेकाळची दिवाळखोर कंपनी एलन मस्क यांनी व्यक्तिगत संपत्तीचा वापर करून वाचवली. नवा इंधन पर्याय म्हणून ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांची सवय टेस्लाने लावली. आता खनिज तेलासाठी खोदकामाला ट्रम्प यांनी दिलेला अग्रक्रम मस्क यांच्या व्यावसायिक गणितांना छेद देणारा आहे.
अमेरिकेला पुन्हा सर्वश्रेष्ठ बनविण्यास निघालेले डोनाल्ड ट्रम्प स्वतःला आणि देशाला हास्यास्पद बनवत आहेत. अमेरिकेला बदलून टाकण्याची गर्जना करत सत्तेवर आलेले ट्रम्प देशातील उद्योग - व्यवसायासाठी जोखीम बनले आहेत. डॉलरला पर्याय देण्याची भाषा मधल्या काळात ‘ब्रिक्स’मधील देशांकडून सुरु होती. ट्रम्प यांना डॉलरची नव्हे, क्रिप्टो करन्सीची चिंता आहे. त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानला क्रिप्टो करन्सीची राजधानी बनविण्याचे स्वप्न पाहात असून पाकिस्तानमधून दहशतवादाची अखंड निर्यात होत राहिली तरी त्यांना फरक पडणार नाही. ट्रम्प यांच्या विजयात टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ओतलेला अमाप पैसा होता आणि मस्क यांची साथही होती. सहसा उद्योगपती उघडपणे कोणत्याही राजकीय गटाची बाजू घेत नाहीत. जे प्रभावी गट, राजकीय पक्ष असतील त्यांना आर्थिक रसद देण्यात मात्र ते मागे नसतात. उघडपणे रिपब्लिकन पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देऊन एलन मस्क यांनी फार मोठी जोखीम घेतली. समजा डेमोक्रॅटिक पक्षाची सरशी झाली असती, तर मस्क यांच्या टेस्लाचे खरे नव्हते. विरोधाभास म्हणजे आपण समर्थन दिलेला पक्ष आणि त्याचा उमेदवार विजयी होऊनही मस्क यांच्यासमोर संकट उभे राहिले आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर मस्क अमेरिकेच्या शासकीय कार्यक्षमता विभागात कार्यरत झाले. सरकारी खर्चात कपात करणे, हे उद्दिष्ट ठेवून ते कामाला लागले; पण सरकारी खर्चात कपात म्हणजे मोठ्या घटकाच्या नाराजीला निमंत्रण, हे फार परिपक्वता नसली तरी ट्रम्प यांना ठाऊक आहे.
महाभियोगाची सूचना
अमेरिकेत सामाजिक सुरक्षा योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तो कमी करावा, ही मस्क यांची भूमिका ट्रम्प यांना मान्य होणारी नव्हती. मस्क यांनी पदाचा राजीनामा दिला. ट्रम्प यांनी आणलेले ‘वन बिग अँड ब्यूटिफुल बिल’ अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्जात बेजबाबदार भर असल्याचा आरोप मस्क यांनी केला. खर्चाचे प्रमाण कमी करण्याचे आश्वासन त्यांनी पाळले नाही, एवढाच आरोप करून मस्क थांबले नाहीत. त्यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालविण्याची सूचना केली आहे, त्याही पुढे जाऊन लैंगिक शोषणासंदर्भातील ‘एप्स्टिन फाइल’मध्ये ट्रम्प यांचे देखील नाव आहे, या आशयाची पोस्ट त्यांनी केली. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा अमेरिकेतील एक अब्जाधीश जेफ्री एप्स्टिन याच्यासोबतचे ट्रम्प यांचे छायाचित्रही त्यांनी पोस्ट केले. अमेरिकेतील गर्भश्रीमंतांच्या वर्तुळाची काळी बाजू म्हणजे एप्स्टिन प्रकरण. यात रिपब्लिकन असोत अथवा डेमोक्रॅट, दोन्ही पक्षांचे सहानुभूतीदार आहेत. म्हणूनच मस्क यांच्या गौप्यस्फोटानंतर तेथील विरोधकांकडून या मुद्द्यावर फार प्रतिक्रिया आल्या नाहीत, शिवाय हितसंबंधांना धक्का पोहोचू नये यासाठी आतापर्यंत ती कागदपत्रे उघड करण्यात आलेली नाहीत. आता मस्क यांनी ती पोस्ट हटवली असली तरी दोघांचे मनोमीलन अशक्य आहे. मस्क यांनी केलेल्या आरोपांचा ट्रम्प यांच्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही. याचेे कारण सतत वादाच्या केंद्रस्थानी राहणे ही त्यांची मानसिक गरज आहे! फटका बसेल तो मस्क यांना! मस्क यांनी आरोप केल्यावर ट्रम्प यांनी मस्क यांची रॉकेट कंपनी स्पेसएक्स आणि उपग्रहामार्फत इंरनेट सेवा पुरविणारी स्टारलिंक यांच्याशी असलेले सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली. याला प्रत्युत्तर म्हणून मस्क यांनी स्पेस कॅप्सुलच्या सेवा स्थगित करण्याचा मनोदय जाहीर केला. मस्क यांना त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे सोपे नाही. याचे कारण अंतराळ कार्यक्रम हा कुठल्या व्यक्तीचा नसून देशाचा असतो. अमेरिकी नागरिकांना तिसरा राजकीय पर्याय हवा आहे का? याची चाचपणी करण्यासाठी मस्क यांनी त्यांच्या ‘एक्स’चा आधार घेतला. अमेरिकेचे जनमत दोन प्रबळ राजकीय गटांमध्ये ठळकपणे विभागले असताना तिसरा पर्याय इतक्यात स्वीकारला जाऊ शकत नाही. लहरी ट्रम्प आणि व्यावसायिक यश पणाला लावणारे मस्क यांच्यातील आरोपांच्या फैरीने अमेरिकेतील गुंतवणूकदारांचे मात्र धाबे दणाणले आहे.
Related
Articles
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
14 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेलचा मृत्यू
18 Jun 2025
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
12 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
सुरक्षा सचिवपदी चंद्र शेखर
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !